पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा गौरव

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषि क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांसह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका आणि आर्मिंदा फर्नांडीस यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व सन्मानितांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 भूमीपुत्रांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. दरम्यान, सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता.

महाराष्ट्रातील 4 जणांचा गौरव

रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
भिकल्या लडक्या धिंडा (महाराष्ट्र)
श्रिरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
आर्मिदा फर्नांडीस (महाराष्ट्र)

दरम्यान, महाराष्ट्रातील 4 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार असून लोकनाट्य, कृषी क्षेत्रातील योगादनाबद्दल महाराष्ट्राला हा सन्मान मिळाला आहे.