जिल्हा परिषद कुटे वस्ती शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ध्वजपूजन सोन्याबापू कुटे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहण देडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य जालूमामा खांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. सभेचे अध्यक्षस्थान जालूमामा खांडे यांनी स्वीकारले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुनील गायकवाड सर यांनी केले. प्रास्ताविकामधून शाळेची होत असलेली प्रगती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता उपस्थित ग्रामस्थ समोर सांगितली.
इयत्ता बालवाडी, पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयात भाषणे करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीगीतावर आधारित संगीतमय कवायत सादर केली सादर केली व पाहुण्यांची वाहवा मिळवली.
देडगाव केंद्रात झालेल्या विविध गुणदान व सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पालक मनोगत मधून बबलू कुटे यांनी शाळेची होत असलेली प्रगती व विद्यार्थी गुणवत्ता, तसेच शाळेच्या प्रगतीबद्दल मदतीचे आश्वासन दिले. विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या प्रगती बद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले.
शाळेच्या उत्कृष्ट प्रगतीबद्दल कल्याण कुटे यांनी विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी एक संगणक जाहीर केले. तसेच काही ग्रामस्थांनी शाळेच्या भौतिक प्रगतीसाठी रोख रक्कम दिली.
यावेळी शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे, ग्रामपंचायत सदस्य जालूमामा खांडे,उपाध्यक्ष नवनाथ तिडके, शिक्षण तज्ञ चेअरमन ज्ञानदेव कदम, जयहरी सोन्याबापू कुटे, सदस्य अर्जुन घोडके, सदस्य बंडू लाडके, तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राम कुटे, उपाध्यक्ष बबलू कुटे तसेच सोन्याबापू कुटे, मनोज खांडे, बाबासाहेब काकडे, दत्तोबा कुटे,
महादेव कुटे, ऋषीं घोडके,संतोष कोकरे,देवराव कुटे,बन्सी खांडे,गहीनाथ कुटे,भाऊसाहेब कदम,देवराव खांडे,भानुदास कुटे
सुनिल कुटे, तुळसाताई तिडके अंबाबाई लाडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सीमा गायकवाड मॅडम यांनी मानले.