बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तेलकुडगाव येथील प्रवासांच्या सेवेसाठी तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या पाठपुरावाला यश मिळत श्री क्षेत्र तेलकुडगांव ते अहिल्यानगर एसटी सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरळीत सुरू झाली आहे.
तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच अनेक मित्रमंडळी यांच्या सहकार्याने गेली सात ते आठ महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य परिवहन आगार विभाग नेवासा व अहिल्यानगर परिवहन महामंडळ या ठिकाणी वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा करण्यात आला. नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी देखील या मागणीची दखल घेऊन एस टी सुरू होण्यासाठी विशेष सहकार्य केले.
श्री क्षेत्र तेलकुडगाव येथे श्री क्षेत्र तेलकुडगाव-कुकाना-मार्गे- घोडेगाव-अहिल्यानगर या मार्गे येण्या-जाण्यासाठी लालपरी एसटी ची निंतात गरज होती. कारण, तेलकुडगाव हे नेवासा तालुक्यातील शेवटचे गाव आहे. गावातील नागरिकांना अहिल्यानगर येथे आपले शासकीय काम असेल, मुख्य हॉस्पिटल हे जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे गावातील अनेक रुग्णांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी जाण्यासाठी नितांत गरज आहे, बळीराजा शेतकऱ्यांची महसूल विभागाअंतर्गत प्रांतस्तरावरील कामे, जिल्हा परिषद, कलेक्टर अॉफिस, जिल्हा बँक, मधील कामासाठी ग्रामस्थांपैकी कोणी अहिल्यानगर येथे ऍडमिट पेशंट असेल तर डबे देण्यासाठी किंवा डॉक्टरने पुन्हा तपासणीसाठी बोलावले तर अनेक वेळा जावे लागते, आमच्या तेलकुडगाव येथील अनेक मुले-मुली पुढील उच्च शिक्षणासाठी अहिल्यानगर-दौंड-पुणे-मुंबई या ठिकाणी शिक्षण घेत असल्यामुळे त्यांची देखील गैरसोय न होता वेळेवरती येण्या जाण्यासाठी गावापासून निघण्यासाठी व सुखरूप गावापर्यंत पुन्हा येण्यासाठी सुखरूप प्रवासाची गरज होती, शेतकरी बांधवांनां मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी, बँकेचे कामकाज असेल, किंवा दैनंदिन दळणवळणासाठी शहरात व जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमी जावे लागते, तसेच गावामध्ये तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आणि त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलचे माध्यमिक विद्यालय व कॉलेज आहे तरी अनेक विद्यार्थी व पालकांना येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत होती, तेलकुडगाव येथील ग्रामस्थ दिवसभराचे आपले कामकाज आटोपून पुन्हा सायंकाळी आपल्या घरी सुखरूप येण्यासाठी एसटीची आवश्यक गरज होती. अशा अनेक कारणांमुळे आपल्या गावातील बंधू भगिनी व ग्रामस्थांना नितांत दैनंदिन एसटीची गरज होती.
त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नेवासा व अहिल्यानगर यांच्याकडे तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून सातत्याने कागदोपत्री पाठपुराव्यामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील रस्ता सुरक्षिततेचे पत्र व एसटी मुक्कामी राहण्याची सुरक्षितता, ड्रायव्हर व कंडक्टर यांना राहण्याची सुविधा, या सर्व बाबीची खात्री दिली व अखेर तेलकुडगाव ग्रामपंचायत सरपंच सर्व पदाधिकारी व वेळोवेळी अनेक वेळेस पाठपुरावा करण्यासाठी सोबत आलेले मित्रमंडळी यां सर्वाच्या प्रयत्नाला व पाठपुराव्याला यश आले व शेवटी श्री क्षेत्र तेलकुडगाव ते अहिल्यानगर ही बस सेवा सोमवार 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनापासून सुरळीतपणे सुरू झाली. लाल परी एसटी बसचे गावामध्ये आगमन झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन तरुणांनी फटाके वाजवून स्वागत केले व सकाळी ग्रामस्थांनी एसटी बसची पुजा करून ड्रायव्हर सातपुते व स्नेही कंडक्टर जाधव पाटील यांचा सन्मान करून एसटीचे स्वागत केले. श्री सतिशराव काळे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग महामंडळ व आमदार श्री विठ्ठलरावजी लंघे पाटील भाऊ यांचे तेलकुडगांव येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानले. अखेर अनेक दिवसांपासूनचे आपल्या तेलकुडगावातून लालपरी एसटी सुरू होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी संपर्क साधून कौतुकाची थाप देऊन समाधान व्यक्त केले व शुभेच्छांचा वर्षाव केला.
अखेर आमच्या ग्रामस्थांचं अनेक दिवसापासूनचं लालपरी एस टी बसचं स्वप्नं प्रजासत्ताकदिनी पूर्ण झाले. श्री क्षेत्र तेलकुडगांव ते अहिल्यानगर ही एस टी बस सुरू व्हावी, ही अपेक्षा पूर्ण झाली. सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी या बससेवेचा दैनंदिन लाभ घ्यावा. ही बस सुरळीत सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ग्रामस्थ व बंधू भगिनीने कौतुक करुन शुभेच्छा दिल्या हाच मोलाचा आशीर्वाद.
– सतिशराव काळे पाटील (सरपंच)


