देडगाव येथे स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय व ग्रामपंचायतच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील नवी पेठ येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती.       यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सरपंच चंद्रकांत मुंगसे, रघुनाथ कुटे पुढारी, पावन महागणपती देवस्थानचे विश्वस्त अशोकराव मुंगसे, आमदार विठ्ठलराव लंघे मित्र मंडळाचे मच्छिंद्र मुंगसे यांनी आपल्या मनोगतातून दादांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असून कायम एका कोहिनूर हिऱ्याची राजकारणात कमी राहील, शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताचे कार्य त्यांनी केले व सर्व समावेशक राजकारण करत महाराष्ट्रात आदर्श राजकारणी म्हणून ओळख निर्माण केली होती. अशा कार्य धुरंदर कार्यसम्राट उपमुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय व ग्रामपंचायतच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे, बन्सी पाटील मुंगसे, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, माजी सरपंच मच्छिंद्र मामा कदम, चंद्रभान कदम, संभाजीराव काजळे, सुभाष मुंगसे, दत्ता पाटील मुंगसे, पोपट बनसोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य दादासाहेब एडके, सुरेश कुटे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त सुनीलशेठ मुथ्था, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, भगवान मुंगसे, माजी उपाध्यक्ष जनार्धन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, कानिफनाथ गोयकर, बहिरनाथ एडके, विलास मुंगसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार  छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने सांगता करण्यात आली.