तेलकुडगावचे ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रा उत्सवाची नियोजन बैठक उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगांव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रा महोत्सव शुभारंभ प्रसंगी समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत मान्यवर मंडळी शुभहस्ते पत्रिका पुजन करत, नारळ वाढवून यात्रोत्सवास शुभारंभ करण्यात आला.
श्री क्षेत्र तेलकुडगांव येथील महाशिवरात्रीपासून १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी चार दिवसीय ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी निमीत्त सभामंडपात नियोजन बैठक घेऊन चैतन्य नागनाथ महाराज चरणी नारळ वाढवून, पत्रिका पुजन करून ग्रामदैवतांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात करण्यासंदर्भात चर्चा करून नियोजन करण्यात आले. यात्रा कमिटी अध्यक्ष श्री. सतिशराव काळे पाटील, हभप अमोल महाराज घाडगे, श्री पोपट काळे सर, यांनी यात्रोत्सवाची व जंगी कुस्त्यांच्यां हंगामा ची सविस्तर रुपरेखा सांगून सर्व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन यात्रेसाठी परिसरातील व बाहेरील जिल्ह्यातील सर्व कला कसरतकार यांना निमंत्रण देऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले. सर्वाशी चर्चा करुन चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव कमिटीला जबाबदारी देऊन, सर्वांच्याच सहकार्यातून भव्यदिव्य यात्रा महोत्सव उत्साहात करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
रविवार दि. १५/०२/२०२६ सकाळी महाशिवरात्री निमित्त हभप गणेशजी महाराज कुदळे श्री दत्त संस्थांन चिंचोडी. यांची किर्तनसेवा होईल व तद्नंतर महाफराळ पंगत श्री जनार्दन रामचंद्र गटकळ मा..चेअरमन, श्री अरुण भिवसेन घाडगे मा.चेअरमन, श्री किशोर काळे सर, चि.प्रणव नवनाथ गटकळ, श्री भिमराज जयवंत घोडेचोर, श्री भाऊसाहेब बापू काळे, श्री अशोक गोविंद घाडगे यांच्यावतीने होईल. सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी दुपारी ४.०० वा कावडी प्रस्थान, चैतन्य नागनाथ महाराजांच्या मुर्तीस जलाभिषेक करण्यासाठी गंगाजल आणणाऱ्या भाविकांनी देवाचे पावित्र्य राखत गंगाजल आणावे चांगली सजावट असणाऱ्या तीन कावडीला बक्षिस दिले जाईल.
यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दि १७/०२/२०२६
सकाळी ८.३० ते ११.३० भव्यदिव्य कावडी मिरवणूक, पारंपरिक वाद्यात लेझीम होईल चैतन्य नागनाथ महाराज मुर्तीस गंगाजलस्नान संपन्न होईल व रात्री ८ ते १०.०० छबीना मिरवणुक, शोभेच्या दारूची आतीषबाजी व रात्री ९.३० ते ११.३० राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर लोकनाट्य तमाशा होईल, नंतर रात्री देवाचा जागर होईल.
शनिवार १८/०२/२०२६ सकाळी ८:३० वा. हनुमान मंदिर प्रांगणासमोर हजेरीचा कार्यक्रम व दुपारी ३ ते ७ समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने श्री चैतन्य नागनाथ क्रिडा संकुल श्रीरामनगर येथे नामांकित मल्लांच्या, कुस्त्यांचा जंगी हगामा होईल. यावर्षी यजमानांच्या व गावकर्याच्या आर्थिक सहकार्यातून जवळपास तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नियोजित गावकर्याच्या डोळ्यांचे पारणे फिटतील, अशा राष्ट्रीय पंचकमिटीच्या माध्यमातून नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्यां लावण्यात आलेल्या आहेत. ऐनवेळी येणारे पहिलवान यांची नावनोंदणी हंगामाच्या सुरवातीला १ ते २ या वेळेत होईल. तरी सर्व गावकरी, मिठाई दुकानदार, स्टेशनरी दुकानदार, कसरतकार, कलाकार यांनी यात्रा प्रसंगी आप-आपली हजेरी लावून यात्रोत्सवाची शोभा वाढवावी.
यात्रा उत्सवाच्या तयारी निमित्त नियोजन बैठकीमध्ये गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, भाविक उपस्थित होते,
सतिशराव काळे सरपंच, शरदराव काळे उपसरपंच, बालकनाथ काळे मा सरपंच, , सुरेश साहेब काळे साहेब मा.सरपंच, एकनाथ घोडेचोर मा.उपसरपंच, अशोकराव काळे मा.उपसरपंच, रेवन्नाथ काळे मा.सरपंच, साईनाथराव काळे, मा.उपसरपंच भारत काळे, महेश गटकळ ग्रा.सदस्य, नामदेव घोडेचोर ग्रा.सदस्य, संतोष सरोदे ग्रा.सदस्य, बापू साळवे, मच्छिंद्र काळे, सुर्यभान घोडेचोर, नारायण काळे, ज्ञानेश्वर काळे मा. चेअरमन, लक्ष्मणराव काळे संचालक, अरुण घाडगे मा.चेअरमन, रघुनाथ काळे, पृथ्वीराज गटकळ, रमेश काळे, प्रसाद घोडेचोर, बापू गटकळ सर, विकास काळे सर, प्राचार्य सोपानराव काळे सर, पोपट काळे सर, राष्ट्रीय पंच निकाळजे सर, बाळासाहेब काळे सर मा.चेअरमन, मधुकर घाडगे सर, आबासाहेब घाडगे सर, शंकर घोडेचोर, काकासाहेब काळे मा.चेअरमन, चंद्रकांत म्हस्के चेअरमन, देवस्थान सचिव अर्जुन गायकवाड, अध्यक्ष हनुमंत गटकळ, आदिनाथ थोरात, सचिन काळे, दिपक घाडगे, लक्ष्मण काळे, रुपचंद गटकळ, शिवराम घोडेचोर, शंकर गायकवाड, सोपानराव गटकळ, राहुल काळे, बाळासाहेब काळे, रविंद्र काळे, अशोक काळे संचालक, दिगंबर काळे संचालक, तुळशीराम काळे भाऊ, गोवर्धन काळे, संदीप घाडगे, नामदेव म्हस्के, सुखदेव घाडगे, संजय घोडेचोर, शिवाजी घोडेचोर, दत्तुराजे काळे, कचरु गायकवाड, सोपान शेंडगे, अशोक म्हस्के, बाळासाहेब माने, विजय गुंजाळ, सुदर्शन काळे, महादेव काळे, राजेंद्र गटकळ, श्रीकांत घाडगे, किशोर घोडेचोर, छानदेव घोडेचोर, राजेंद्र तेलधुने, अशोक सरोदे, आत्माराम घोडेचोर, मोहनराव काळे, भाऊसाहेब काळे, रमेश काळे, नामदेव म्हस्के, बंडू घोडेचोर, म्हतारदेव काळे, शहाराम घोडेचोर, शैलेश देवा, अॅड.सचिन घोडेचोर, गौतमशेठ गुगळे, संजय घाडगे, संतोष काळे, सुनील राजहंस, शेटे संभाजी, सुदाम काळे, राहुल घाडगे, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, बबनतात्या म्हस्के, देविदास काळे, आजीनाथ काळे, कानिफनाथ घोडेचोर, संपत घाडगे, दानियल साळवे, राजुकाका घाडगे, विष्णू घाडगे, सुदामराव काळे, रमेश घोडेचोर, संभाजी घोडेचोर, संभाजी काळे, देविदास परभणे, योगेश उनवणे, पोपटराव सरोदे वंचित अध्यक्ष, आत्माराम काळे, भगत बबन, त्रिमूर्ती फोटो दादासाहेब, शंभुराजे फोटो बाळू, रुद्र फोटो अरुण, कमलेश काळे, गणेश घाडगे पत्रकार, एकलव्य फोटो राहुल, दवंगे फोटो, संजय काळे पत्रकार, राजेंद्र तेलधुने, अशोक सरोदे, बाळासाहेब गटकळ, अनिल घाडगे, पातळे जगन्नाथ, बाळासाहेब घाडगे, रामदास शेलार, राजेंद्र साळवे, भगवान गटकळ, बाबासाहेब काळे, कृष्णा सरोदे, सागर सरोदे, विरेंद्र घोडेचोर, ज्ञानेश्वर घोडेचोर, सर्व नाथभक्त, मान्यवर मंडळी, सर्व विवीध संस्था-समितीचे पदाधिकारी, सर्व मित्र मंडळी, समस्त ग्रामस्थ,आदि. मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सोपानराव काळे सर, प्रगतशील शेतकरी रेवन्नाथ काळे, शरदराव काळे उपसरपंच, यांनी मार्गदर्शन करून यात्रोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी तेलकुडगावचे भूमिपुत्र डॉक्टर कमलेश महादेव काळे हे MBBS पूर्ण करून डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सामुहिक सन्मान करण्यात आला.
आपले ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी, सर्व ग्रामस्थ मंडळी, नाथभक्त, भाविकांनी सहकार्य करावे ही विनंती. श्री सतिशराव काळे पाटील सरपंच व श्री शरदराव काळे उपसरपंच यांनी सर्वांचे आभार मानले.