माका येथील राजश्री शाहू महाराज विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माका येथे बाल आनंद मेळावा भरवण्यात आला. मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचे सह-सचिव विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापूरे, दिनेश चव्हाण उपस्थित होते.
या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतीतील भाजीपाला,फळे,तर काहींनी भेळ,पाणीपुरी,पोहे, थालीपीठ विक्रीसाठी आणले होते.यातून बरीच आर्थिक उलाढाल झाली.
यावेळी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वसंत घुले यांनी सेवापूर्तीनिमित्त शाळेला एक संगणक संच भेट दिला. शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर शेटे यांच्या कल्पनेतून हा बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक भुसारी सर, मच्छिंद्र एडके, अमोल नवथर, ज्ञानदेव कदम, सुरेश घोडेचोर, प्रसाद कानडे, संकेत चेके, कैलास चव्हाण उपस्थित होते. संदीप गर्जे सर यांनी आभार मानले.