येणाऱ्या पिढीवर संस्कार होण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम गरजेचे: भास्करगिरीजी महाराज

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- येणाऱ्या नवीन पिढीसाठी व त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले. बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित महादेव देवस्थान अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.
यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सदाशिव महाराज पुंड, बाळू महाराज कानडे, हभप बाबासाहेब महाराज वांढेकर, सरपंच चंद्रकांत मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, सतीश मुथ्था, सुनील मुथ्था, भानुदास गटकळ, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, भाजप नेते आकाश चेडे, रामभाऊ कुटे, रघुनाथ कुटे पुढारी, जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, हरिभाऊ देशमुख, अरुण वांढेकर, विठ्ठल क्षीरसागर, समस्त ग्रासस्थ व भजनी मंडळ देडगाव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप नांगरे सर यांनी केले.