श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली. यामध्ये प्रथम नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कडूभाऊ तांबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. माजी सरपंच महादेव पुंड, अ‍ॅड. कुणाल शिंदे, हरिभाऊ गोयकर, योसेफ हिवाळे, सुरेश हिवाळे, जालिंदर खांडे, नारायण एडके, संतोष तांबे, जालिंदर तिडके, असलम पठाण, सभासद, खातेदार उपस्थित होते. शाखेतील अधिकारी राहुल मुंगसे, योगेश भारती, अक्षय तिडके, शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.