बालाजी देडगाव येथे शिव मंदिर पायाभरणीचा शुभारंभ

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शिव मंदिर पायाभरणीचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, आकाश चेडे, निलेश कोकरे, चांगदेव तांबे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, संकेत मुंगसे, खंडू कोकरे सर, अमोल ठोंबरे, अशोक मुंगसे, जालिंदर वांढेकर, सोन्याबापू कुटे, अमोल कुटे, गोयकर, ज्ञानेश्वर मुंगसे, मधु देवा तांदळे, अभय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.