‘चर्च ऑफ द नाझरीन’च्या १९ व्या वर्धापन दिनाला उत्साहात प्रारंभ

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील स्थानिक ‘चर्च ऑफ द नॅझरीन’च्या वतीने चर्चचा १९ वा वर्धापन दिन मंडळीचे पालक रेव्ह. बाळू वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 मार्च ते 22 मार्च या सप्ताहात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध विशेष संजीवनी सभा व उपवास प्रार्थना उपक्रमांनी या महोत्सवाची सुरुवात झाली.
यामध्ये रेव्ह.भारत सूर्यवंशी, रेव्ह शाहरुख पठाण, रेव्ह विनय गायकवाड, रेव्ह वसंत गायकवाड, पास्टर कैलास टेंभुरकर,पास्टर अभय घोडके यांच्या संजीवन सभा व कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात चर्चच्या प्रमुखांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि प्रार्थनेने झाली. गेल्या १९ वर्षांतील चर्चची प्रगती आणि सामाजिक कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
या सोहळ्यासाठी केवळ गावातील नव्हे, तर परिसरातील अनेक भाविक हजेरी लावतात. चर्चचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आला आहें. कार्यक्रमाच्या शेवटी दररोज प्रीतीभोजनाचे’ आयोजन करण्यात आले आहें. ज्यामध्ये सर्व समाजबांधव एकत्र सहभागी होतात.
या सप्ताहासाठी गोगलगाव, गळणिंब,नेवासा खुर्द, पाथरवाला,गोंडेगाव,चिंचोली, आडगाव, फेअर बँक मेमोरियल चर्च देडगाव, येशु प्रार्थना भवन चर्च, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सागर अशोक दळवी, मनीषा जाधव,सुनिता भाकरे, काजल वाकडे,शुभम कोल्हे, अजय दळवी, वसंत भानुदास सकट,रवींद्र रामभाऊ दळवी, कृषी कन्या महिला बचत गट देडगाव,आप्पासाहेब दळवी, उपसरपंच आनंद दळवी,संदीप मिरपगार या अन्नदात्याकडून प्रीती भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी चर्च ऑफ द नॅझरीनचे अध्यक्ष, विश्वस्त व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.