नेवासा तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात सोपान तांबे यांच्या बैलजोडीचा डंका; आमदारांच्या हस्ते प्रथम क्रमांकाने सन्मानित

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तालुका पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती नेवासा यांच्या वतीने भेंडा खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात बालाजी देडगाव येथील प्रगतशील शेतकरी सोपान उत्तमराव तांबे यांच्या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे व जिल्हा दुग्ध व्यवसाय उप आयुक्त डॉ. उमेश पाटील, तहसीलदार संजय बिराजदार, गट विकास अधिकारी संजय लखवाल, महाव्हेटचे राज्य अध्यक्ष डॉ.अनिल गडाख, अशोकराव मिसाळ , अंकुशराव काळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व 11 हजार रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. अक्षय सोपानराव तांबे यांनी हे बक्षीस स्विकारले. यावेळी मा. उपसभापती काशिनाथ नवले हे अध्यक्ष लाभले होते.
पशूधनाचे जतन व्हावे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने भेंडा येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी आपली उत्तम दर्जाची जनावरे सहभागी केली होती. यामध्ये सोपान तांबे यांच्या सर्जा राजा या बैलजोडीने आपल्या रुबाबदार शरीरयष्टी आणि उत्तम जोपासनेमुळे परीक्षकांचे मन जिंकले.
यावेळी बोलताना आमदारांनी सोपान तांबे यांच्या मेहनतीचे कौतुक केले. करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या “शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालनाचे महत्त्व मोठे आहे. तांबे यांच्यासारखे शेतकरी आपल्या अस्सल पशूधनाचे जतन करून पुढील पिढीसमोर आदर्श ठेवत आहेत. असे उदगार त्यांनी काढले.
यावेळी देडगाव येथे तांबे परिवाराच्या वतीने सर्जा राजाचे फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. व महिलांनी औक्षण करून पूजन करण्यात आले.
यावेळी सोपानराव तांबे म्हणाले की, सर्जा राजावर आम्ही संपूर्ण परिवार मुलासारखे प्रेम करतो व त्यांच्यामुळे आम्हाला वैभव पाहण्याला मिळाले. या सर्जा राजासोबत आमच्या कुटुंबाचा खूप मोठा जिव्हाळा आहे. आमचे वडील स्व.उत्तमराव तांबे यांच्यापासून बैलजोडी जोपासण्याचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.आम्ही तो जोपासला असून कायम हा वारसा पुढे ठेवू.
सर्जा राजाच्या या पुरस्काराबद्दल संजय तांबे, बाळासाहेब तांबे,शरद तांबे व तांबे परिवार भारावून गेले होते.
या पुरस्कारामुळे सोपान तांबे यांच्यावर मा. आमदार पांडुरंग अभंग साहेब व देडगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.