वै. ह‌.भ.प. रामायणाचार्य दत्तोबा महाराज रिंधे यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील वै. ह‌.भ.प. रामायणाचार्य दत्तोबा महाराज रिंधे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जेऊर हैबती येथील श्री क्षेत्र पावण हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर व संत- महंताच्या उपस्थित रिंधे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी संतचरित्रकार बाळकृष्ण महाराज रिंधे यांच्या रसाळ वाणीतून ९ ते ११ हरिकिर्तन संपन्न झाले. यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. प्रा. नारायणराव म्हस्के सर, वायुनंदन मंडप परिवाराचे सर्वेसर्वा सुभाष म. औटी, प्रगतशील शेतकरी भास्करराव कोलते, ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के, शिवाजी महाराज वाघ, महेशजी महाराज रिंधे, अन्नासाहेब म्हस्के पाटील, बाबासाहेब म्हस्के अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जेऊर गावच्या पोलीस पाटील मिनाक्षी अजय रिंधे, ह‌.भ.प. ज्ञानेश्वरजी महाराज तांबे, ह.भ.प.कृष्णा महाराज उगले, डॉ‌.भागवत यांनी आदरांजली वाहिली. प्रा. प्रदीप ताके सर यांनी सूत्रसंचालन केले. तर ह.भ.प.दत्तोबा महाराज रिंधे यांचे बंधू शंकरराव रिंधे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.