बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान शाखा-पाथर्डीच्या वतीने तीन दिवसीय शिव आराधन अध्यात्मिक प्रवचन व भजन संकीर्तनाचे आयोजन बालाजी मंदिर सभा मंडपात २ जून ते ४ जून या रोजी दररोज सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनुष्याला त्याच्या दैनंदिन जीवनात पडणाऱ्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे व भगवान शिवजींच्या दिव्य स्वरूपामागील आध्यात्मिक रहस्य आध्यात्मिक ग्रंथानुसार संत महापुरुषांच्या वाणीतून मिळणार आहेत. तसेच या कार्यक्रमातून मनुष्याला तणावमुक्त करून मनशांती प्राप्त करून देणारी प्राचीन व शाश्वत ध्यानाची पद्धत कोणती? भक्तीसाठी गुरुची आवश्यकता आहे का? आहे तर भगवान शिवजी गुरुगितेमध्ये पूर्ण सद्गुरुची ओळख काय सांगतात? शिव भक्तीमध्ये मनुष्याच्या वर्तमान जीवनातील सर्व समस्यांचे समाधान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे का? ते कसे? ग्रंथानुसार ईश्वर प्राप्ती करून देणारा शिव भक्तीचा शाश्वत मार्ग कोणता? भारतीय संस्कृती, देशभक्ती, समाजसेवा व मनुष्याच्या दिव्य गुणांना जागृत करणारी शाश्वत प्रक्रिया कोणती? वर्तमान काळात ईश्वर दर्शन संभव आहे का? ते कसे? या आणि अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अध्यात्मिक धर्मग्रंथांच्या आधारे दिली जातील, तरी आपण इष्टमित्र, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी देवस्थान देडगावचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे , बालाजी यात्रा कंपनी, बालाजी बचत गट, बालाजी केटरर्स, बालाजी रिवाइंडिंग वर्क्स देडगाव, माऊली उद्योग समूह यांच्यासह दिव्य ज्योती जागृती संस्थान संचलित युवा परिवार सेवा समितीने केले आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी देडगाव व देडगाव परिसरातील भाविक भक्तांनी शिवआराधन या अध्यात्मिक दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.