पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तेलकुडगाव येथे कर्तबगार महिलांचा सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करून कर्तबगार महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी भारतीय संस्कृतीचे पुनर्जीवन करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतातील कर्तबगार स्त्रियापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एक होत. अहिल्यादेवीचां जन्म ३१ मे १७२७ रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चौडी या छोट्यासा खेड्यात झाला.
रयतेतेचे राजे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजानंतर लोककल्याणकारी राज्य चालविण्यासाठी राणी अहिल्यादेवी राज्यकारभारात तरबेज होत्या. दीन-दुबळ्यांसाठी आईसमान,तत्वज्ञानी आणि कुशल संघटक होत्या. अहिल्यादेवी होळकर या उत्तम शासक असताना त्यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यावर भर दिला. देशभरातील बारा ज्योतिर्लिंग व इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले आणि ते पूर्ण देखील केले. श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, नाशिक, ओंकारेश्वर, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, श्रीशैलम, उडीपी, गोकर्ण, काठमांडू इत्यादी ठिकाणी मंदिरे बांधली. अहिल्यादेवी यांनी शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला.
तेलकुडगाव येथील अनेक महिला पुरस्कार देण्यासाठी निश्चित पात्र आहेत, परंतु यावर्षी २०२४-२५ मध्ये तेलकुडगाव येथील पुढील महिलांना ग्रामपंचायत तेलकुडगांव यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार तेलकुडगांव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांच्या शुभहस्ते देण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप सन्मान चिन्ह-ट्राफी, प्रशस्तीपत्र, मानधन, शाल श्रीफळ व सन्मान अशाप्रकारे होते.
यावेळी हिराबाई जनार्दन परभणे-अंगणवाडी सेविका. अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देऊन नेहमी चांगले कार्यात सहभाग असल्यामुळे एक आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शोभा गजानन इंगोले आशा सेविका. आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना काळासह साथीचे आजार, बाळांना लसीकरण अशा चांगले कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुराधा संजय काळे-CRP. ग्रामसंघ महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील अनेक बचत गटातील महिलांना बचतीचे महत्त्व सांगून बँकेच्या माध्यमातून कर्ज बचत गटांना कर्ज उपलब्ध करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी चांगले योगदान सहकार्य आणि सर्व गटाच्या सीआरपी प्रमुख म्हणून पुरस्कार प्रदान. करण्यात आला. कोमल राम भेंडेकर- नाथ भक्त, गावातील विविध सामाजिक, धार्मिक, महिलांचे शासकीय कार्यक्रम सार्वजनिक उपक्रमामध्ये नेहमी सहभाग म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच लताताई सतिशराव काळे, मा.सरपंच रंजना बालकनाथ काळे, ग्रामविकास अधिकारी काळे बी बी भाऊसाहेब, उपसरपंच सुरेखा शरद काळे, उपसरपंच एकनाथ घोडेचोर, माजी सरपंच अर्चना सुरेश काळे, उपसरपंच अशोकराव काळे, आरोग्य अधिकारी डॉ.चिलगर, केंद्रीय पोलीस अभिमन्यू काळे, चेअरमन अरुण घाडगे, गजानन इंगोले, अंगणवाडी सेविका मंदा गुंफेकर, पद्मा घोडेचोर, मीरा घोडेचोर, भगत संगिता, रोहिणी काळे , अनिता काळे, घाडगे मंगल, आशा सेविका घाडगे शुभांगी, सविता घोडेचोर, साळवे संगिता, महिला बचत गटांच्या विजया काळे, मनिषा सरोदे, उज्वला काळे, अस्मिता काळे आदी महिला व ग्रामपंचायतचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त तेलकुडगांव ग्रामपंचायत, समस्त ग्रामस्थ, सर्व महिला भगिनी यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.