बालाजी देडगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शिवभक्त, छावा मित्र मंडळ, ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (तिथीप्रमाणे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवून आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जयघोष करण्यात आला. यावेळी भाजप नेते आकाश चेडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, सोपान मुंगसे, विवेक औटी, संकेत मुंगसे, श्रावण औटी, विशाल मुंगसे, सौरभ मुंगसे, अमोल म्हस्के, माऊली मुंगसे, रोहन म्हस्के, करण काळे, मेजर सिद्धार्थ मुंगसे, किरण मुंगसे, अनिकेत कुटे, रोहन मुंगसे, सलमान पठाण, कार्तिक मुंगसे, अमोल आंबाडे, गणेश कुंभार, पप्पू भिसे, ओम मुंगसे, ओंकार काजळे, मिनीनाथ मुंगसे, रवी भणगे, बंडू टकले, सोपान मुंगसे, रोहन कदम, विनीत मुंगसे, आकर्षण मुंगसे, पप्पू वांढेकर, किरण मुंगसे, महेश वांढेकर, बहिरनाथ मुंगसे, अरुण वांढेकर, उद्धव नांगरे, योगेश काजळे, करण कोकरे आदी उपस्थित होते.