बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे गुरुवारी (ता.१२) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे झालेल्या नुकसानीची आमदार विठ्ठलराव लंघे पाटील , तहसीलदार संजय बिराजदार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी रामदास शिंदे, महावितरणचे अधिकारी महाजन साहेब, मराठे साहेब, सर्कल खंडागळे रावसाहेब, ग्रामसेवक काळे भाऊसाहेब, तलाठी श्रीखंडे भाऊसाहेब, किसान मोर्चाचे अंकुशराव काळे, बबनराव पिसोटे, कृषी सहाय्यक रवींद्र जगधने, सरपंच सतिशराव काळे आदी पदाधिकारी यांनी पाहणी केली. प्रामुख्याने सचिन जनार्दन परभणे घराचे पत्रे उडाले, अरुण भिवसेन घाडगे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला, अनिता नवनाथ गटकळ यांच्या घराचे पत्रे उडाले, विजय दत्तात्रय गुंजाळ यांच्या केळीचे नुकसान, नामदेव बाजीराव काळे यांच्या पपई बागेचे नुकसान, सोमनाथ हनुमंत काळे डाळिंब बागेचे नुकसान, सोपान शेंडगे यांच्या मेंढ्यांच्या गोठ्याचे पत्रे उडाले आहेत, याची पाहणी केली. सर्व पिकांची पाहणी केल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे पिकांचे व घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सरपंच सतीशराव काळे, उपसरपंच शरद काळे, उपसरपंच एकनाथ घोडेचोर, संजय घोडेचोर, साईनाथराव काळे, रेवन्नाथ काळे, रमेश काळे, पृथ्वीराज गटकळ, पत्रकार गणेश घाडगे, संदीप घोडेचोर, संचालक अशोक काळे,
दादासाहेब काळे, वैभव शेंडगे, ज्ञानेश्वर घोडेचोर, तात्यासाहेब काळे, अर्जुन कर्डिले, वाकचौरे भाऊराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
