बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता पाचवीला येणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने पेन व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके व पत्रकार युनूस पठाण उपस्थित होते. आलेले मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड सर यांनी केले. तसेच या नवीन वर्षाचा सुरुवातीला संस्थेअंतर्गत बदल्या होऊन नूतन शिक्षक या ठिकाणी रुजू झाले आहेत. पर्यवेक्षक डी. जी. कदम सर यांची बदली होऊन त्या ठिकाणी राशिनकर सर हे पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले आहेत. तर नवीन शिक्षक कोळेकर सर, कल्हापुरे सर, चंद्रकांत गायके सर, मचे सर व पवार भाऊसाहेब विद्यालयात बदली होऊन आलेले आहेत. त्यांचेही शाळेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड व क्रीडाशिक्षक दसपुते सर यांचा वाढदिवस साजरा करत सन्मान करण्यात आला. यावेळी गोरे सर, भुजबळ सर, कोठुळे सर, तोडमल सर, वाघस्कर सर, कोलते सर, गायकवाड आर एन , दसपुते सर, गायकवाड आर बी, श्रीमती मकासरे मॅडम आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
