बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील केंद्र शाळा देडगाव अंतर्गत तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रथम प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व बुके देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे, उपाध्यक्ष योगेश तांबे व इतर सदस्य तसेच पांडुरंग तांबे, रमेश तांबे, महेश तांबे, अशोक तांबे, नारायण तांबे, शाळेचे मुख्याध्यापक कचरे सर, उपाध्यापक नांगरे सर उपस्थित होते.
याप्रसंगी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी ताई सुसे मॅडम यांच्या हस्ते मुलांना गोड जेवण देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना व शाळेला पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांगरे सर यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक कचरे सर यांनी मानले.
