राहुल पालवे यांच्या अभंग, गवळणीचे आकाशवाणीवर सलग तीन दिवस होणार प्रसारण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव पालवे यांचे सुपुत्र संगीत विशारद राहुल पालवे यांच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी नगर केंद्रावर झालेल्या अभंग गवळणीचे ध्वनीमुद्रण आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना प्रचंड आवडल्यामुळे या कार्यक्रमाचे प्रसारण सलग तीन दिवस होणार असून ३० जून, १ जुलै व २ जुलै रोजी सायंकाळी ६.४० वाजता हे प्रसारण होणार आहे. याबद्दल पालवे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.