बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पवधीत नावारूपास आलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका मध्ये लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम मान्यवर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, तसेच संस्थेच्या संचालिका श्रीमती. मिना बनसोडे व प्रमुख पाहुणे विक्रम चेके यांचे शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित वंचितांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्यातून सामाजिक न्यायाचा व समतेचा संदेश दिला. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा .सागर बनसोडे यांनी केले. दरम्यान विद्यार्थी कृष्णा संतोष सानप तर शिक्षिका प्रतिक्षा जाधव,रिना भालेराव, शुभांगी सानप,उषा गिते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री पटेकर यांनी केले. तर आभार जयश्री जगताप यांनी मानले.
