स्व. एकनाथ मारुती गंगावणे यांचा बुधवारी दशक्रियाविधी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील स्व. एकनाथ मारुती गंगावणे (वय १००) यांना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली असून त्यांचा दशक्रियाविधी बुधवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी हिवरे येथील गंगावणे वस्ती (माका रोड) येथे होणार आहे. दशक्रियाविधीनिमित्त भागवताचार्य हभप समाधान महाराज शर्मा यांची किर्तनसेवा होणार आहे. एकनाथ गंगावणे हे सुमारे ४० वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. त्यांनी माजी आमदार कॉम्रेड वकीलराव लंघे पाटील, बाबा आरगडे, माजी आमदार बीपी कडू पाटील, माजी आमदार अमृत डांगे, माजी आमदार नामदेवराव आव्हाड, माजी आमदार राम रत्नाकर, माजी आमदार एकनाथ भागवत, माजी आमदार बाळासाहेब नागवडे यांच्यासोबत सामाजिक कार्य केले. सामान्य कामगार, भूमिहीन शेतकरी यांच्यासाठी अनेक वर्षे लढा दिला अनेक आंदोलनात सहभाग घेतला. महालक्ष्मी हिवरे येथे अनेक वर्ष त्यांनी सरपंचपद भूषवले. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र भगवानराव गंगावणे हे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी आहेत. सध्या ते शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

तरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. भगवान एकनाथ गंगावणे (मुलगा) गं.भा. सुमनबाई म्हाळूबा पालवे (मुलगी), सौ. कमलबाई प्रल्हाद सानप (मुलगी), सौ. सत्यभामा कृष्णा तांदळे (मुलगी) तसेच समस्त गंगावणे परिवार यांनी केले आहे.