देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व झाडांना राख्या बांधण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, निसर्ग प्रेम व वृक्षांबद्दल आपुलकी हे संस्कार रुजवण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी रक्षाबंधन, निसर्गप्रेम, कला याबरोबरच हर घर तिरंगा या राष्ट्रीय उपक्रमाची माहिती सांगितली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. शाळेला देडगाव ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील मुंगसे, आनंद दळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी,उत्तम सकट,दानियल दळवी,अविनाश दळवी,प्रदिप मिरपगार,महेश दळवी, योसेफ दळवी, प्रकाश दळवी, सिमोन दळवी, दिपक दळवी, विलास दळवी, संभाजी तांबे, अविनाश तांबे,नामदेव तांबे, अशोक दळवी,संभाजी दळवी,सुनिल दळवी,शाम दळवी,योहान दळवी,अमोल कोल्हे,संदिप दळवी,सुनिल कोल्हे,सनी आढाव,संतोष दळवी,राकेश दळवी,ईश्वर भवार,गहिनीनाथ भवार आदी पालक,ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असते. शाळेच्या विविध उपक्रमांना गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम, विस्ताराधिकारी केदार मॅडम, केंद्रप्रमुख कमल लाटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत असते. सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ व आभार सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी मानले.