बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- संत रोहिदास महाराजांनी विविधतेतून एकात्मतेचा संदेश दिला. सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. तसेच कर्म हीच पूजा असल्याचे संत रोहिदास महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले, असे प्रतिपादन हभप गुरुवर्य महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री (श्री क्षेत्र शृंगऋषीगड) यांनी केले.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी हभप गुरुवर्य महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री यांचा सन्मान केला.
यावेळी हभप माऊली महाराज सदने, हभप प्रदीप महाराज वाघमोडे, हभप विशाल महाराज कारंडे, हभप बापू महाराज लोंढे, हभप युवराज महाराज हाके, हभप पांडुरंग रक्ताटे महाराज, हभप माळवदे महाराज, युवा नेते निलेश कोकरे, खंडू कोकरे सर,
पावन गणपती देवस्थानचे तज्ञ संचालक अशोक मुंगसे, माजी चेअरमन राजाराम मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, सिताराम गोयकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे, कैलासनाथ मित्र मंडळाचे हरिभाऊ देशमुख, प्रल्हाद भगत, कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळीस शास्त्री महाराजांनी संत रोहिदास महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
