देडगाव येथील महादेव मंदिरात शिखर बांधकामाचे भूमिपूजन

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महादेव मंदिरातील गणपती मंदिर शिखर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. हस्तरेषा तज्ञ कनकमलजी मुथ्था यांच्या प्रेरणेने व कैलासनाथ मित्रमंडळाच्या अधिपत्याखाली महादेव मंदिर व परिसरात विविध कामे सुरु आहेत. यावेळी सोपान तांबे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.

शिखर बांधकाम भूमिपूजन प्रसंगी सपना वेलनेस परिवाराचे संचालक डॉ.अर्जुन सुसे, सागर सुसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे सोपान तांबे, सतिश मुथ्था, पत्रकार बन्सीभाऊ एडके, अशोक चेडे, काका देशमुख, नरेश मेजर, लक्ष्मण पंडित, नवनाथ गोयकर, पोपट बनसोडे, बाबासाहेब तांबे, भगवान मुंगसे, नितीन तिडके, कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, मंदिर शिल्पकार संग्राम दगडगावे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजू देवा तांदळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.