पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवी स्पर्धेत माका महाविद्यालयाचे यश

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथील विद्यार्थिनी वैष्णवी भारत लोंढे हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तर रेश्मा शिवाजी थोरात हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच निबंध स्पर्धेमध्ये वैष्णवी शिवाजी म्हस्के हिने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थीनींचे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थीनींना प्रा. दत्ता कोकाटे व प्रा. शुभम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.