तांबे वस्ती येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथे राष्ट्रपिता भारतरत्न महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष योगेश तांबे मुख्याध्यापक कचरे सर, सहशिक्षक नांगरे सर तसेच विद्यार्थी हजर होते. मुख्याध्यापक कचरे सर यांनी या थोर महापुरुषांचे जीवन चरित्राचा व या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. सहशिक्षक रामेश्वर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जीवनचरित्र त्यांच्या ओघवतया शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.