देडगाव येथील संत रोहिदास महाराज देवस्थानची नूतन कार्यकारणी जाहीर

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज देवस्थानची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. देवस्थानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये देवस्थानचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षपदी मारुती रामदास एडके, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर एकनाथ एडके यांची तर सचिवपदी प्रल्हाद बन्सीभाऊ एडके, सहसचिवपदी हरिभाऊ महादेव एडके यांची निवड करण्यात आली. तर देवस्थानच्या विश्वस्तपदी कृष्णा रंगनाथ एडके, राजू महादेव एडके, दादासाहेब शंकर एडके, विठ्ठल अशोक एडके, पांडुरंग नारायण एडके, गणेश बहिरनाथ एडके, सोमनाथ बाजीराव एडके, गोरख शिवाजी एडके, राजू मोहन एडके, बाळासाहेब लक्ष्मण एडके, रमेश भिकाजी बताडे, मोहन रामलाल बताडे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश एडके सर यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सेवा संस्थेचे माजी चेअरमन राजाराम मुंगसे, ज्येष्ठ शिक्षक संजयकुमार लाड, रामदास एडके, राजू एडके, सागर एडके, उद्धव एडके, आकाश एडके, सत्यम एडके, रोहित एडके, प्रेमचंद हिवाळे, बाळासाहेब बताडे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पांडुरंग एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.