देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त प्रथम शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी, पालक, शिक्षक व अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी आपल्या मनोगतात महापुरुषांना अभिवादन करत शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले. शालेय गुणवत्ता, शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन शाळेला सहकार्याचे आश्वासन दिले. अभिषेक घटमाळ सरांनी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषाशैलीत महापुरुषांचे व राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छताबाबत विचार समजावून सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. सुत्रसंचालन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी मानले.