वै. बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देडगाव येथे किर्तनसेवेचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या निर्माण कार्यात प्रमुख असलेले वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता. ११) बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हभप भागचंद महाराज पाठक यांची किर्तनसेवा होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त तांबे परिवार, बालाजी देडगाव ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी केले आहे.