बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. शंकर बाबुराव लाड यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये महादेव मंदिर येथे ज्ञानेश्वरी उपासक हभप राम महाराज खरवंडीकर यांची किर्तनसेवा होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गं. भा. छबुबाई शंकर लाड (पत्नी), संजयकुमार शंकर लाड (मुलगा), सौ. सुनीता अशोक हराळे (मुलगी), राजेंद्र शंकर लाड (मुलगा) यांनी केले आहे.
