बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे व डॉ. अमोल दहातोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. चोपडे म्हणाले की, आपण संविधान समजून घेतले पाहिजे व त्याचा वापर विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी करावा. तसेच संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा. अजित हरिश्चंद्रे व प्रा.शहाबाज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक उपस्थित होते.

