देडगाव येथे संत रोहिदास महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
बालाजी देडगाव येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहामध्ये संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांनी संत रोहिदास महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी पावन गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे, संत रोहिदास महाराज देवस्थानचे विश्वस्त पांडुरंग एडके, राम दीक्षित, संदीप चेडे, पप्पू चेडे, दीपक देशमुख, चेडे, झाकीर पठाण, स्वरवैभव ऑर्केस्ट्राचे संचालक राजेंद्र ससाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेवटी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.