जनशक्ती (वृत्तसेवा)- श्रीक्षेत्र देवगड येथे श्री दत्त जयंती सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी सहा वाजता देवगड देवस्थानचे प्रमुख हभप महंत भास्करगिरीजी महाराज तसेच उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज व कैलास गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पाळण्याची दोरी ओढून हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित महिलांनी दत्त जन्माचे पाळणे म्हटले. तसेच दत्तजन्म सोहळ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई तसेच आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी पुरोहितांच्या शुभहस्ते दत्तात्रय भगवंताच्या मूर्ती तसेच सदगुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीस प्रवरा तीरामध्ये जल अभिषेक करण्यात आला. तसेच पूर्ण देवगड मंदिर परिसरामध्ये किसनगिरी बाबा तसेच दत्तात्रय भगवंताच्या मूर्तीचे प्रदक्षिणा करण्यात आली.
या सोहळ्याप्रसंगी हभप भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे ,अक्षय कर्डिले, देवस्थानचे चोपदार बाळासाहेब महाराज कानडे, शुभम बनकर, संदीप साबळे, राहुल ठोंबरे,अंकुश काळे, तसेच यावेळी लाखो भाविक मोठ्या भक्ती भावाने या दत्त जयंती सोहळ्यात देवगड देवस्थान येथे उपस्थित होते.
तसेच यावेळी देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी सर्व भक्त परिवारांना आशीर्वाद दिले व दत्त जन्म सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंडित शर्मा मिश्राजी महाराज प्रयाग्रज यांनी दत्त जयंतीच्या निमित्ताने उपस्थित राहून सर्व दत्त भक्तांना शुभाशीर्वाद दिले.


