ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास बालाजी देडगाव ग्रामस्थांची भेट

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ग्रामस्थांनी ठाणे जिल्ह्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील पहिल्या मंदिराला भेट दिली. देडगाव येथील छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांच्या संकल्पनेतून या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मराडेपाडा हे ठिकाण भिवंडी, ठाणे जिल्ह्यात आहे. जेथे अलीकडेच महाराष्ट्रातील पहिले भव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधण्यात आले आहे. जेथे शिवक्रांती प्रतिष्ठानने एक सुंदर स्मारक आणि शक्तिपीठ तयार केले आहे. ज्यात तटबंदी, बुरुज आणि आकर्षक प्रवेशमार्ग आहे, जे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आणि दर्शनीय स्थळ बनले आहे.
यावेळी गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, चांगदेव महाराज तांबे, पत्रकार इन्नुस पठाण, रॉबिन हिवाळे आदी उपस्थित होते. यावेळेस देडगाव ग्रामस्थांनी या मंदिर व परिसराची माहिती जाणून घेतली. यावेळी येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने देडगाव ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.