तक्षशिला विद्यालयात ‘वाण सुवासिनीचे’ सोहळा उत्साहात  

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-अलीकडच्या काळात प्रत्येक घरात मोबाईलचा वापर कमालीचा वाढला आहे. अनेकदा लहान मुले जेवण करत नाहीत म्हणून माता त्यांच्या हातात मोबाईल देतात. यामुळे मुलांना आपण कोणत्या चवीचे अन्न खातो याचे भान राहत नाही, ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर होतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर त्यांना जेवताना मोबाईलपासून दूर ठेवा,” असे प्रतिपादन प्रसिद्ध डॉ. शीतल वेताळ यांनी केले.
येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित ‘वाण सुवासिनीचे’ या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी ‘आहार, आरोग्य आणि बालसंगोपन’ या विषयावर डॉ. वेताळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका विमल गडाख होत्या. यावेळी गडाख म्हणाल्या, “महिला हा कुटुंबाचा  कणा आहे. त्यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय परंपरेत आयुर्वेदाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे चौरस आहाराचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. यावेळी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे:
सेव्ह द बलून स्पर्धा: पूजा गोल्हार (प्रथम क्रमांक)
संगीत खुर्ची पुजा वाघमोडे (प्रथम क्रमांक), उखाणे स्पर्धा: शीतल बजांगे (प्रथम क्रमांक)
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी  मन्वंतर संस्थेचे अध्यक्ष प्रो. डॉ. विजय कदम, डॉ. भागवत वेताळ, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, उपप्राचार्य मयुरी पवार आदिंनी आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गायकवाड यांनी केले, तर अर्चना मडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संचालीका शुभांगी कदम, माजी सरपंच स्वाती मुंगसे, सोनाली चेडे, सुवर्णा कदम, संध्या कडु, अर्चना क्षीरसागर,  मीनाक्षी मुंगसे, दिपाली तांबे, अश्विनी मुटकुळे, पूजा वांडेकर, सोनाली वांडेकर, श्रद्धा औटी आदी महिला सहभागी झाल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती मुंगसे, सारिका दहीफळे, स्वाती लोंढे,पूनम चिमकडे, अल्फिया शेख, अमृता शिंदे, चैताली कर्डिले, कोमल आगळे, श्रुतिका उगले, शुभांजली दळवी, शुभांजली अलगुंडे, वैषाली वाहुरवाघ यांच्यासह तक्षशिला स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.