जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये खास मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी ‘हळदी कुंकू’आणि ‘न्यू होम मिनिस्टर’खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या भव्य दिव्य कार्यक्रमाला सलाबतपुर व परिसरातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने दीप प्रज्वलनाने आणि श्री गणेशाच्या स्तवनाने झाली. यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे निर्माते गणेशाचे संस्थेचे विश्वस्त अंबादास गोरे, मनोहर बनसोडे, पत्रकार बन्सी एडके,युवा नेते मच्छिंद्र भाऊ मुंगसे , मधुकर क्षीरसागर,अप्पासाहेब गोरे, पत्रकार दादासाहेब निकम, इन्नूस पठाण, भास्कर गोरे व त्यानंतर हळदी कुंकवाचा आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व महिलांनी एकमेकींना ‘हळदी कुंकू’लावून शुभेच्छा दिल्या. व त्यानंतर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध निवेदक गणेश भाऊजी हापसे यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर’हा माता-भगिनींचा आवडता हा खेळ प्रसिद्ध टीव्ही शोच्या धर्तीवर आयोजित केलेला या खेळात महिलांसाठी विशेष मनोरंजन स्पर्धा आणि उखाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
संगीत खुर्ची, झटपट प्रश्नमंजुषा, बॉटल गेम, बिस्किट गेम, फुगे फोड गेम, रस्सी-खेच, हास्य स्पर्धा, पावली नृत्य, टिपरी नृत्य, गोंडा बांधणे, खराट्याने फुगे फोडणे, अवघड वाक्य बोलणे, पासिंग बॉल अशा विविध स्पर्धा या कार्यक्रमात घेण्यात आल्या. या कार्यक्रमांमध्ये भव्य लकी ड्रॉ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला व मानाच्या पैठणीच्या मानकरी सौ. गायत्री मगर, राणी तांबे, मनीषा वाकचौरे, शितल वाघ, रत्नमाला काळे, सविता तांबे, पुनम वाघ, सोनाली शिंदे, मंगल भुजबळ, कल्याणी नवले, वनिता कोरडे यांनी ‘न्यू होम मिनिस्टर चा किताब” आणि मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. व लकी ड्रॉ मधील सौ.पूजा नांगरे,कल्याणी नवाळे, पूनम गोरे,वनिता व्यवहारे,जयश्री भडके योगिता भडके,रेणुका खाटीक,गीता कदम अश्विनी गोरे,विठ्ठल रोडगे प्रियांका,पंडित रंजना उदे,लता गायकवाड,मयुरी निकम पायल शेरे या विजेत्या ठरल्या.
आपल्या प्रास्ताविक पर मनोगत मध्ये संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्री. प्रा.सागर बनसोडे यांनी संस्थेच्या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गोल्ड मेडल मिळवले व शाळा वर्षभर शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवत असते. प्राचार्य श्री. रवींद्र गावडे सर यांनी सण उत्सवाच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र येऊन आनंद साजरा करतात यामुळे सामाजिक बंध अधिक दृढ होतात.आसे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी सलाबतपुर,शिरसगाव,गिडेगाव, दिघी, बाबुळखेडा, गोंडेगाव म्हासले ,गोगलगाव ,मंगलापूर, गळनिंब, सुरेगाव, वरखेड, माळेवाडी ,वाकडी ,गेवराई, गोपाळपूर या गावातून शाळेच्या माता पालक व बचत गटाच्या सर्व अध्यक्षा, उपाध्यक्ष व सदस्य महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ छाया निकम,मीनाक्षी तांबे,कोमल मस्के,उमा कुऱ्हाडे,छाया लालझरे वर्षा गोरे, आरती उंदरे, रेणुका गोरे, प्रज्ञा घुले, श्री शाहरुख सय्यद, निलेश निधाने, संतोष निकम, कैलास तांबे, संजय गरूटे, अशोक मगर, किरण हिवाळे, विजय साळुंके, दत्ता काळे, अरुण हिवाळे यांनी परिश्रम घेतले.


