कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, हळदी कुंकू समारंभ उत्साहात  

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयहरी सोन्याबापू कुटे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युन्नुस पठाण, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, अरुण वांढेकर आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापका गायकवाड सर यांनी प्रास्ताविक केले. मनोगतात बबलू कुटे, बन्सीभाऊ एडके, युन्नुस पठाण, मच्छिंद्र मुंगसे यांनी आपले विचार मांडले. बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाॅल लावले होते. मान्यवर व पालकांनी स्टाॅलवर खरेदीचा आनंद लुटला. यानंतर महिलांचा हळदी कुंकू समारंभ पार पडला. यामध्ये महिलांनी विविध खेळ, वाण वाटप व उखान्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड मॅडम यांनी केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे, ज्ञानदेव कदम, जालिंदर तिडके,  सदस्य अर्जुन घोडके, बबलू कुटे, मच्छिंद्र माळी, मच्छिंद्र मुंगसे, सुरेश कुटे, कृष्णा घोडके, भगवान कुटे, आप्पा कुटे, सौरभ कुटे, उमाबाई कुटे, मीराबाई काकडे, मीना कुटे, सुशीला कुटे, पुष्पा कुटे, अदिती लाडके,अर्चना हिवाळे, जिजाबाई नांगरे, अंगणवाडी सेविका बनसोडे, कविता हिवाळे, सुशीला माळी, ताराबाई कुटे, अरुणा तिडके, मंदा कुटे, मोनिका खांडे, भीमाबाई कदम, ज्योती कुटे, आशा कुटे, संगीता घोडके, मनीषा हिवाळे, राणी हिवाळे आदी पालक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेला गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, विस्ताराधिकारी मिरा केदार, केंद्रप्रमुख कमल लाटे, केंद्र मुख्याध्यापक सतिशकुमार भोसले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. या कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.