बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील बालाजी मंदिर सभामंडपात उद्या रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळेस आयोजित न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना विविध आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी बालाजी देडगाव व परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळ, देडगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.


