बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर येथे हळदीकुंकू समारंभ, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच आहार व व्यायाम मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम शुभांगीताई रेवन्नाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
फिट इंडिया मिशन अंतर्गत महिला व पुरुषांसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार मेजर संजय घोलप सर, विशाल घोलप सर व नितीन जाधव सर यांनी उपस्थित माता-पालक व नागरिकांना संतुलित आहार, व्यायाम व आरोग्यविषयक मार्गदर्शन करून आरोग्य तपासणी केली.
अध्यक्षीय भाषणात शुभांगीताई काळे यांनी आरोग्याचे महत्त्व व भारतीय संस्कृतीतील हळदीकुंकू समारंभाचे सामाजिक मूल्य स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब निवृत्ती लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी लांघे यांनी तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव काळे यांनी केले.
कार्यक्रमास महिला, माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जया काळे , मयुरी काळे , अर्चनाताई सुरेश काळे,प्रतीभा घाडगे , गयाबाई काळे, रुख्मिणी गायकवाड, बबबाई काळे , बेबीताई शेलार , सविता काळे, ज्योती काळे, मनिषा नवघरे , ज्योती माने, आशाबाई काळे , सोनाली गटकळ , सोनाली काळे , सुजाता काळे , उज्ज्वला सरोदे , प्रियंका सरोदे, गीता काळे , रेखा गटकळ, अर्चना शेलार , कविता शेलार , कल्पना काळे ,स्वाती सरोदे , इंदुबाई सरोदे , सुनिता गटकळ , वेणूबाई काळे , स्वाती घाडगे, गंगुबाई काळे , जया घाडगे, अर्चना गायकवाड , शितल घाडगे, लता घाडगे , वैशाली सरोदे , अंजली आगळे , पद्माबाई घोडेचोर , ज्योती शिंगटे , निताताई शिंगटे , रोहीणी काळे, आसरा बाई गटकळ , आंतिका काळे , वैशाली गायकवाड , अर्चना गायकवाड, बकनगरे ताई, सुरेखा वारकड, जनाबाई काळे मॅडम, वैशाली उभेदळ मॅडम तेलकुडगाव,
नानासाहेब शिंगटे, बाबासाहेब काळेसर, संदिप काळे, दिपक घाडगे, राहुल सरोदे, अशोक शिंगटे, दिपक काळे , रामचंद्र काळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी भोजनाचा आनंद घेतला व कार्यक्रम समाप्त करण्यात आला.


