नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे बंडू महाराज मुंगसे यांचा सन्मान 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगावचे भूमिपुत्र बंडू महाराज मुंगसे यांनी ७० दिवसांमध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा जिल्हाभरात विविध ठिकाणी संत-महंत, मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  बंडू महाराज मुंगसे यांचा देवगड येथे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते तसेच देडगाव ग्रामस्थ व भजनी मंडळ तसेच विविध संघटनेच्या वतीने बंडू महाराज मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी किसन नाथा मुंगसे, ताराबाई किसन मुंगसे, सुनीता बंडू मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, पत्रकार इंनुस पठाण, संकेत मुंगसे, अशोक मुंगसे, निलेश कोकरे, शिवाजी तिडके, बन्सी मुंगसे, अण्णासाहेब जाधव, सचिन नवथर, राजू पानकडे, युवराज पानकडे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी बंडू महाराज मुंगसे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचे अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.