चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आरोग्य शिबीर उत्साहात

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून व तसेच आय.एस.ओ मानांकन प्राप्त शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सल्ले देण्यात आले.
विद्यार्थ्यांना सकस आहार व व्यायाम याबाबत विद्यार्थ्यांना डॉ.सुजित पठाण यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास श्रीमती गोरे यांचे सहकार्य लाभले. डॉ.सुजित पठाण म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्यास फास्टफूड, चॉकलेट,मॅगी, चिप्स पेक्षा मजबूत व सकस आहार द्यावा. याच वयात मुलांचे शारीरिक व मानसिक वाढ होत असते. म्हणून सकस आहार अत्यंत गरजेचा आहे. सकस आहार न मिळाल्याने मुले उपस्थित होऊन आजारास बळी पडतात. शालेय मुलांना समूहात राहणे आवडते. त्यामुळे संसर्गजन्य आजार पासून त्यांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या आजारावर देखरेख ठेवण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य रवींद्र गावडे सर म्हणाले. संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे सर यांनी विद्यार्थीदशा हा जीवनाचा पाया आहे, जर शरीर सुदृढ असेल तर मन प्रसन्न राहते आणि अभ्यासात एकाग्रता येते. ‘सुदृढ शरीर हीच हीच खरी संपत्ती’ असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपला आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
शिबिर यशस्वीतेसाठी छाया लालझरे, वर्षा गोरे, उमा कुऱ्हाडे, मीनाक्षी तांबे, रीबिका बर्वे, छाया निकम, रेणुका गोरे, प्रज्ञा घुले, सपना बोकेफोड, शाहरुख सय्यद, निलेश निधाने, संजय गरूटे, संतोष निकम, कैलास तांबे, अशोक मगर, विजय साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.