बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आपल्या अष्टपैलू अध्यापन शैलीने आणि शिस्तप्रिय स्वभावाने आदर्श शिक्षक म्हणून ओळख निर्माण केलेले भास्कर तांबे सर यांची नुकतीच शिक्षण विभागाच्या ‘केंद्रप्रमुख’ पदी निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल व आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत सेवानिवृत्त झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे होते. तर हा कार्यक्रम त्यांच्याच संकल्पनेतून घेण्यात आला होता.
तांबे सर यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन शासनाने त्यांना ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण गावाचा नावलौकिक वाढला असल्याची भावना चेअरमन सागर बनसोडे, मच्छिंद्र मुंगसे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे यांनी व्यक्त केल्या. तर सावंत सरांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांनाही पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
गावातील मुख्य चौकात आयोजित या कार्यक्रमात तांबे सरांचा व सावंत सरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पहार देत गौरव करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी सभापती कारभारी चेडे, खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, चांगदेव महाराज तांबे, मा. उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ कुटे, मुरलीधर आप्पा मुंगसे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी, चेअरमन खंडेश्वर कोकरे, संजय वांडेकर, संजय कुमार लाड, राजेंद्र बनसोडे, लांघे सर, सर्जेराव ससाने, बाबासाहेब तांबे, राजेंद्र ससाने, ग्रामपंचायत सदस्य शरद तांबे, बन्सी पाटील मुंगसे, देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख, संजय कुटे, व गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि त्यांचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकाने केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा, हे सरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या निवडीमुळे आमच्या भागातील शैक्षणिक गुणवत्तेला नक्कीच नवी दिशा मिळेल, असे मत विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना भास्कर तांबे सर म्हणाले, हा सत्कार माझा नसून माझ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचा आणि ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाचा आहे. केंद्रप्रमुख म्हणून काम करताना गुणवत्तेवर आधारित शिक्षण आणि शाळांचा कायापालट करणे, हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.
तसेच सावंत सरांनी ही सत्कार ला उत्तर देत असताना भाऊक झाले होते .गावाने दिलेल्या प्रेमाबद्दल मी कायम ऋणी राहील अशा भावना व्यक्त केल्या. माजी विद्यार्थ्यांनी सरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन बथुवेल डी हिवाळे यांनी मानले.


