शास्त्रीनगर शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शास्त्रीनगर (चांदा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी सर्व मुले, पालकांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.
यावेळी बाबासाहेब थोरात, योगेश वाघमारे या पालकांनी मुलांना मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर फुलारे, कडूभाऊ भालेराव, अनिता चौरे, संगीता चौरे, सरिता वाघमारे, कल्पना थोरात, ताराबाई कुऱ्हाडे, हिराबाई कुऱ्हाडे, ताराबाई गवळी आदी पालक उपस्थित होते. विशाखा बोरगांवकर मॅडम व सय्यदअली सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.