बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कला कार्यानुभव उपक्रम घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते रघुनाथ कुटे यांनी प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभाग घेतला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना चांगलीच आवडली. सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी पर्यावरणपूरक, उन संरक्षक कडक कागदी टोपी बनवायचं शिकवले.
तसेच मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी विविध डाळी, तांदूळ यापासून कलाकृती बनवायचे शिकवले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे, सोमनाथ मुंगसे, अनिता शेटे, लता ताके,अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे, मदतनीस राधिका मुंगसे यांचे व पालकांचे सहकार्य लाभले.
शाळेला वेळोवेळी गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, विस्ताराधिकारी भागीनाथ बडे, केंद्रप्रमुख भास्कर तांबे, केंद्रमुख्याध्यापक सतिशकुमार भोसले यांचे मार्गदर्शन लाभत असते.

