बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या २ जूलै रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यात वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाची सुरुवात बालाजी देडगाव येथून करण्यात आली. यावेळी बालाजी येथील खंडोबा मंदिर परिसर, महादेव मंदिर परिसर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यातील गाव तिथे वृक्षारोपणाचा संकल्प यावेळेस बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी व्यक्त केला.
यावेळी बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, भाजपचे नेवासा तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, कैलासनाथ मित्रमंडळाचे राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ मुंगसे, डॉ. फुलारी, निलेश कोकरे, अमोल म्हस्के, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सौरभ मुंगसे, अक्षय चेडे, अमित कुटे, पत्रकार इन्नुस पठाण, बहिरनाथ मुंगसे, राहुल कुटे, तांदळे देवा आदी उपस्थित होते.


