हा फक्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम नाही… विचारांचा ध्वज उंचावण्याचा क्षण: अभिजीत ससाणे

आपला जिल्हा सामाजिक

नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या पक्ष कार्यालयात मागासवर्गीय समाजाच्या नेतृत्वाला सन्मान देत सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. अभिजित ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वतः झेंडा फडकावण्याची संधी सोडून पक्षासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातात तिरंगा देण्याचे धाडस जिल्हाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे यांनी दाखवले.ही औपचारिकता नाही…
ही सत्तेच्या आणि प्रतिष्ठेच्या पारंपरिक मानसिकतेला दिलेली वैचारिक चपराक आहे! ज्यांच्या भाषणात पुरोगामी विचार असतात, ते अनेक असतात; पण तोच विचार कृतीत उतरवण्याची हिंमत असणारे नेतृत्व विरळच! प्रा. सीताराम काकडे यांनी दाखवून दिले की कार्यकर्ता कोणत्या समाजाचा आहे, हे महत्त्वाचे नाही;
तो कोणत्या विचारांसाठी लढतो, हे महत्त्वाचे आहे! हीच खरी फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा!
हीच खरी सामाजिक समतेची भूमिका! आणि हीच खरी पुरोगामी राजकारणाची ओळख! आज तिरंगा फडकला… पण त्यासोबत सामाजिक न्यायाचा विचारही अधिक उंच गेला! अहिल्यानगरने आज एक संदेश स्पष्टपणे दिला—
राजकारणात केवळ घोषणा नकोत;
सामाजिक समतेची कृती हवी! अभिजित ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रा. सीताराम काकडे यांनी तो संदेश कृतीतून दिला आहे! हा झेंडा केवळ स्वातंत्र्याचा नाही…
हा झेंडा समतेचा, न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा आहे!
– मा.अभिजित ससाणे
जिल्हाध्यक्ष रा.कॉ. सामाजिक न्याय विभाग