बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भातकुडगाव येथील सुमनबाई मोहन गायकवाड यांचा दशक्रियाविधी बुधवारी दि. २१/ १०/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता गायकवाड वस्ती भातकुडगाव येथे होत आहे. दशक्रियाविधीनित्त वेदांताचार्य ह. भ. प. डॉ. प्रा. शरदचंद्रजी महाराज शास्री (आळंदीकर) यांचे सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत किर्तन होणार आहे. तसेच सुमनबाई गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गायकवाड परिवाराच्या वतीने
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगावमधील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात येणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कचरू मोहन गायकवाड (मुलगा), कुशीनाथ मोहन गायकवाड (मुलगा), उषाताई विनायक वाघमारे( मुलगी), तुळशीराम नारायण गायकवाड (दिर) संतोष निवृत्ती गायकवाड (पुतणे), कावेरी बापूसाहेब भोसले (पुतणी) व समस्त गायकवाड परिवार यांनी केले आहे.

