श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या सभासदास नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत पाच लाखाचा धनादेश प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो.या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते. श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट देडगाव शाखेचे खातेदार सभासद कै. महेश सुधाकर कुटे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन छोटे मुलं आहेत. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती त्यांच्या वारसदारास 500000/- रुपये (पाच लाख रुपयेचा) धनादेश रामायणाचार्य ह. भ . प.समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे, ह . भ.प.संतोष शर्मा ,तज्ञ संचालक सीए अमित फिरोदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, जनरल मॅनेजर भरत दारुंटे व नागेबाबा परिवारातील सदस्य उपस्थित होते.