जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरु; नेवासा तालुक्यातील गट व गणाचे आरक्षण जाहीर 

जनशक्ती (वृत्तसेवा)- जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकांची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. आज जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे.   नेवासा तालुका जिल्हा परिषद गटाचे आरक्षण बेलपिंपळगाव गट – सर्वसाधारण महिला कुकाणा गट – सर्वसाधारण महिला भेंडा बुद्रुक गट – सर्वसाधारण पुरुष भानसहिवरा गट – सर्वसाधारण […]

सविस्तर वाचा

कै. शंकर बाबुराव लाड यांचे रविवारी प्रथम पुण्यस्मरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. शंकर बाबुराव लाड यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये महादेव मंदिर येथे ज्ञानेश्वरी उपासक हभप राम महाराज खरवंडीकर यांची किर्तनसेवा होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गं. भा. छबुबाई शंकर लाड […]

सविस्तर वाचा

वै. बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देडगाव येथे किर्तनसेवेचे आयोजन 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या निर्माण कार्यात प्रमुख असलेले वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता. ११) बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हभप भागचंद महाराज पाठक यांची किर्तनसेवा होणार […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक पाळीव प्राण्यांची शिकार या बिबट्याने केली आहे. तसेच अनेकांना या बिबट्याचे मुक्त संचार करताना दर्शन झाले आहे. गावालगत असलेल्या अरुण वांढेकर यांच्या घरासमोर बांधलेल्या बोकडाचा या बिबट्याने आज (ता.८) पहाटे फडशा पाडला. या अगोदर प्रेमचंद हिवाळे यांच्या कुत्र्याचाही या बिबट्याने फडशा पाडला होता. […]

सविस्तर वाचा

बालाजी यात्रेनिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विविध मंदिरांना भेटी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांनी बालाजी देडगाव येथे सदिच्छा भेट देत बालाजी यात्रेनिमित्त श्री बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी श्री बालाजी देवस्थान ट्रस्ट व श्री बालाजी यात्रा कमिटी यांच्यावतीने आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलरावजी लंघे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी देडगाव […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे उद्या यात्रा; विविध कार्यक्रमांचे आयोजन 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या (दि.७ ऑक्टोबर) श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, वै. बन्सी महाराज तांबे यांच्या आशिर्वादाने व हभप गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व हभप स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज […]

सविस्तर वाचा

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

शिर्डी: अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे मंगळवारी बालाजी यात्रा उत्सव

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मंगळवारी (दि.७ ऑक्टोबर) श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तर विजयादशमी व दसरानिमित्त श्री बालाजीच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तर मंगळवारी यात्रा […]

सविस्तर वाचा

खेमनर वस्ती नं. १ शाळेत शिक्षकांचा निरोप व स्वागत समारंभ संपन्न

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माका येथील जिल्हा परिषदेच्या खेमनर वस्ती नं. १ शाळेतून बदली झाल्याने संदीप भंडारे यांचा निरोप समारंभ तर या शाळेत बदली मिळालेले भाऊसाहेब चांडे यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण लोंढे हे होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तुभाऊ खेमनर, दत्तुभाऊ खताळ, बबनराव तमनर, शंकर खेमनर, गणेश लोंढे, नवनाथ […]

सविस्तर वाचा

देडगाव येथील महादेव मंदिरात शिखर सुवर्ण वृक्षाचे वृक्षारोपण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात विजयदशमी व दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर कैलासनाथ मित्र मंडळ व कैलासनाथ स्वयंसहायता बचत गट देडगाव यांच्या संकल्पनेतून सुवर्ण वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. हस्तरेषा तज्ञ कनकमलजी मुथ्था यांच्या प्रेरणेने व कैलासनाथ मित्रमंडळाच्या अधिपत्याखाली महादेव मंदिर व परिसरात विविध कामे सुरु आहेत. हभप सुखदेव महाराज मुंगसे व समस्त ग्रामस्थ, […]

सविस्तर वाचा