महादेव मंदिर देवस्थान येथे गणरायाची प्रतिष्ठापणा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिर देवस्थान येथे गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी कैलासनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्या हस्ते विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी कैलासनाथ मित्र मंडळाचे हरिभाऊ देशमुख, अरुण वांढेकर, भैरवनाथ मुंगसे, नरेश देशमुख मेजर, बबन तांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी […]

सविस्तर वाचा

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर देडगाव येथील शेतकऱ्याचे उपोषण सुटले

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ गेल्या चार दिवसापासून देडगाव येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. त्यांना त्यांच्या गट नंबर ५८३,५८४ या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने उपोषणाची वेळ आली होती.अखेर आज नेवासा तहसीलदार संजय बिराजदार यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या. प्रशासकीय कायद्यानुसार […]

सविस्तर वाचा

शेती रस्त्यासाठी देडगाव तलाठी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ यांनी शेती रस्त्यासाठी देडगाव तलाठी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. गट नंबर ५८३, ५८४ येथील जमिनीत जाण्यासाठी या शेतकऱ्याला रस्ता नसल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात मशागतीसाठी साधने जाण्यासाठी तसेच खते, बियाणे वहिवाट यासाठी संतोष टांगळ यांचे आतोनात हाल होत आहेत. […]

सविस्तर वाचा

कोकरे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कोकरे वस्ती येथे बाबीरबाबांच्या कृपा अशिर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांचे प्रेरणेने हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ अध्याय गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची संत- महंताच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या […]

सविस्तर वाचा

ज्योतिर्लिंग देवस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोयकर वस्ती (गारमाथा) येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरेशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली. यावेळी देडगाव व परिसरातील भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे, हभप सदाशिव महाराज पुंड, हभप एकनाथ महाराज वाघमोडे आदी संत महंत […]

सविस्तर वाचा

स्व. एकनाथ मारुती गंगावणे यांचा बुधवारी दशक्रियाविधी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील स्व. एकनाथ मारुती गंगावणे (वय १००) यांना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली असून त्यांचा दशक्रियाविधी बुधवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महालक्ष्मी हिवरे येथील गंगावणे वस्ती (माका रोड) येथे होणार आहे. दशक्रियाविधीनिमित्त भागवताचार्य हभप समाधान महाराज शर्मा यांची किर्तनसेवा होणार आहे. एकनाथ गंगावणे हे सुमारे […]

सविस्तर वाचा

धर्मध्वजारोहनाने ज्योतिर्लिंग देवस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोयकर वस्ती (गारमाथा) येथे ज्योतिर्लिंग देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताहास हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे व हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या शुभहस्ते धर्मध्वजारोहणाने या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे व आलेल्या भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण […]

सविस्तर वाचा

अक्षय केकाण यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ज्ञानकार्तिका संस्थेचे अध्यक्ष अक्षय केकाण यांना दैवत फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश तर्फे ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ३ ऑगस्ट रोजी शेवगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशन, पदाधिकारी मेळावा तथा समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२५ या कार्यक्रमात आनंदग्राम (इनफॅण्ट इंडिया), पाली (जि. बीड) संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे यांच्या […]

सविस्तर वाचा

तब्बल ४० वर्षानंतर शाळेतले सवंगडी आले एकत्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील श्रीरामपूर येथील रिमांड होम येथे शिक्षण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सहस्नेह मेळावा नेवासा तालुक्यातील विद्यार्थी सखाहरी कोरडे यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी १९८५ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सस्नेहमेळ्याच्या निमित्ताने रिमांड होम येथे गरजू विद्यार्थ्यांना मायेची उब म्हणून ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच मिस्टअन्न भोजनाचाही त्यांना […]

सविस्तर वाचा

बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पवधीत नावारूपास  आलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका मध्ये लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम मान्यवर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, तसेच संस्थेच्या  संचालिका श्रीमती. मिना बनसोडे […]

सविस्तर वाचा